माझं अस्तित्व







जर मला माझ्याबद्दल म्हणजेच , तुमच्या मनाबद्दल काही सांगायचं झालं , तर असं म्हणता येईल की समस्त मनुष्यप्राण्यांमध्ये मी समान रूपांत उपस्थित आहे . आणि तुमच्यातील समजून घेण्याची क्षमता तुम्ही थोडीशी वाढवलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की मनुष्याच्या संपूर्ण आयुष्याची सूत्रं ही सर्वार्थाने माझ्याच हाती आहेत . आणि इथं , माझ्या प्रभावाबद्दल बोलायचंच झालं तर माझा स्पर्श झाला नाही असा , मनुष्य जीवनाचा एकही पैलू नसेल . आणि माझ्या कार्यपद्धतीबद्दल बोलायचं झालं तर ती इतकी क्लिष्ट आहे की माझ्याबद्दल तुम्हाला काहीही समजावून सांगणं तितकसं सोपं नाही आहे . याचं कारण असं की ' मीच ' तुमचं सर्वस्व असून देखील माझ्याविषयी तुम्ही सर्वथा अनभिज्ञ आहात . मला समजून घेण्याच्या आणि आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांत कितीतरी बुद्धिवंत अक्षरशः तोंडघशी पडले आहेत . म्हणूनच सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या अस्तित्वाबद्दल सांगू इच्छितो . कारण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतकी प्रगती करून देखील , विज्ञान माझ्या अस्तित्वाबद्दल अजूनही संभ्रमातच आहे ! अर्थात , याचंही एक पायाभूत कारण आहे . खरं पाहता , विज्ञान हे ' दृष्य ' स्वरूपातील वस्तूंचं निरीक्षण - परीक्षण करून त्यांची कार्यपद्धती शोधण्याचंच दुसरं नांव आहे . विविध वस्तूंच्या संयोगामुळे किंवा घर्षणामुळे होणाऱ्या परिणामांच्या शोधांचं नावंच विज्ञान आहे . माझ्या भाषेत सांगायचं झालं तर , काळ आणि अवकाशाच्या मर्यादेतील वस्तूंची कार्यपद्धती शोधण्याचं नांव विज्ञान आहे . जी वस्तु प्रयोगशाळेच्या टेबलावर आणून पडताळून पाहता येत नाही ; अशा वस्तूंचं अस्तित्व विज्ञान मानत नाही . आणि . . . त्याने तसं मानू ही नये . कारण , विज्ञानाचं हे असं ' अदृष्यते ' वर अविश्वास दाखवणंच त्याच्या सगळ्या प्रगतीमागचं रहस्य आहे . आपल्या अनंत आणि अथक प्रयत्नांद्वारे एकेदिवशी आपल्याला सगळं काही ज्ञात होईल या प्रेरणेनंच विज्ञानाची अशी प्रगतीपथावर वाटचाल सुरु आहे . एकदिवस या भूतलावर एकही गोष्ट ' रहस्यमय ' राहणार नाही , अशा ठाम विश्वासावरच विज्ञान टिकून आहे . अशा अथक प्रयत्नांबद्दल आणि आत्मविश्वासाबद्दल विज्ञानाचं अगदी खचितच कौतुक करायलाच हवं . आपल्या अशा दृढ निश्चयांच्या जोरावर त्याने केवळ चंद्राला आणि मंगळालाच गवसणी घातली नाही तर अत्यंत गहन अशा ' कृष्ण विवरांचा ' देखील मागोवा घेतला आहे ; तसंच महाविस्फोटांच्या सिद्धांतावर देखील अनेक प्रयोगही करून झाले आहेत . इतकंच नव्हे , तर त्याने आता बिग बँगच्या सिद्धांतावर आधारित लार्ज हायड्रॉन कोलायडरसारखे प्रयोग सुरु केले आहेत . असो , मी पुन्हा ' माझं अस्तित्व ' या विषयाकडे वळतो . सांगायचं हेच , की विज्ञानाचे प्रयत्न आणि आत्मविश्वास हा त्याच्या जागी योग्यच आहे . परंतु वास्तविकता हीच आहे की , भूतलावरील गूढ रहस्यं तर दूरची गोष्ट झाली , परंतु माझ्या अस्तित्वाच्या केवळ संकल्पनेपर्यंत देखील विज्ञान फिरकू शकत नाही . कारण सर्व मनुष्यप्राण्यांच्या अगदी नाभिस्थानी , माझ्या सर्व भावभावना , आंतरिक शक्ती आणि विविध तरंगांसहित आणि अत्यंत क्लिष्ट अशा माझ्या कार्यपद्धतीसमवेत मी उपस्थित तर आहे , परंतु तरीही काळ अवकाशाच्या मर्यादांपासून मात्र मी पूर्णतः मुक्त आहे ! म्हणजेच अगदी वैज्ञानिक भाषेत . . .

माझ्याबद्दल असलेल्या रहस्यावरचा पडदा बाजूला सारू पाहतोय ; म्हणूनच मी जे काही बोलेन , ते मला सिद्ध देखील करावंच लागेल . आणि त्या तयारीनिशीच मी तुमच्यासमोर आलो आहे . परंतु इथं अडचण अशी आहे की मला कोणत्याही प्रकारचं भौतिक अस्तित्व नसल्याने , विज्ञानाच्या प्रयोगशाळेत मला काही सिद्ध करता येणं जरा अवघडच आहे . आणि तसंही , जर मी काळ - अंतराळाच्या मर्यादेच्या आत असतो , तर विज्ञानाने केव्हाच माझं विश्लेषण करून मनुष्याच्या जीवनातून चिंता किंवा राग यासारख्या भावना नाहीशा केल्या असत्या . परंतु याचा अर्थ असाही नाही , की माझं अतित्व कोणत्याही प्रयोगशाळेत सिद्धच होऊ शकत नाही ! ' मनुष्य ' हीच माझी चालती - बोलती प्रयोगशाळा आहे . जो कोणी आपल्या बुद्धीचा थोडासादेखील वापर करेल , त्याला माझं अस्तित्व ओळखण्यास जराही वेळ लागणार नाही . . . . केवळ इतकंच करा की , मी सांगितलेल्या गोष्टी आपल्या अंतरंगात अनुभवण्यास सुरुवात करा . कारण माझं अस्तित्व तर तुमच्याच अंतर्गत आहे आणि तुम्हाला होणारी जाणीव हीच माझी प्रयोगशाळा देखील आहे . असो , याच संदर्भात मी माझं म्हणणं पुढे मांडतो . तुम्ही हे तर मान्य कराल की , विज्ञानाचं शरीरासंबंधीचं बहुतांशी संशोधन करून झालं आहे . तुमच्या शरीराच्या कोणत्या भागात काय बिघाड झाला आहे हे रक्ताच्या केवळ काही थेंबांच्या चाचण्यांद्वारे शोधून काढण्यास विज्ञान सक्षम झालं आहे . हेही मान्य करावंच लागेल की हे सर्व बिघाड दुरुस्त करण्याच्या उद्देशाने विज्ञानाने अनेक प्रकारची औषधं देखील निर्माण केली आहेत . इतकंच कशाला , आता तर , तुमच्या शरीराच्या आजारांवर उपाय म्हणून असंख्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास देखील विज्ञान समर्थ आहे . परंतु इतकं सगळं असूनही विज्ञानाची अगतिकता तरी पहा ! भले माझं अस्तित्व विज्ञान नाकारत असेल , परंतु माझ्या सर्व भावना मात्र त्याला देखील स्वीकाराव्याच लागतात . सुख - दुःख असो किंवा चिंता , हे सर्व अनुभव खुद्द वैज्ञानिकांनाही येतच असतात . हे सर्वच हास्यास्पद नाही का ? एकीकडे तर विज्ञान अदृष्याचा स्वीकार करत नाही आणि दुसरीकडे , वैज्ञानिक स्वतःच , रोजच्या रोज या अदृष्य असणाऱ्या भावभावना झेलत असतात ! म्हणजेच , आज नाहीतर उद्या , विज्ञानाला अदृष्याचं अस्तित्व स्वीकारावंच लागेल . शेवटी , जे आहे , त्याच्यापासून विज्ञान तरी किती दिवस पाठ फिरवू शकणार ? भलेही अदृष्याचा सिद्धांत विज्ञानाच्या सिद्धांताशी मेळ खात नसेल परंतु एक ना एक दिवस वैज्ञानिकांना देखील माझ्या अदृष्य भावनांना ' अदृष्य ' स्वरुपातच स्वीकारावंच लागेल . कारण , कितीही अथक प्रयत्न केले तरीही विज्ञान त्यांना तुमच्या शरीरात शोधूच शकणार नाही . तुम्ही स्वतःच स्वतःच्या बुद्धीने विचार करून पहा . विज्ञान कधी अशी चाचणी शोधून काढू शकेल का की ज्यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा रक्ताच्या पातळीप्रमाणे हे सांगू शकेल की कोणत्या व्यक्तीच्या चिंतेची पातळी काय आहे ? विज्ञान , कधी असं एखादं थर्मामीटर बनवू शकेल का ज्याचा वापर करून रागाने त्याची सीमा पार केलीय की नाही हे कळू शकेल ? ब्लडप्रेशर किंवा युरिक ऍसिडच्या गोळ्यांप्रमाणे मनुष्याचं भय किंवा असुरक्षिततेवर नियंत्रण मिळवणारी अशी एखादी गोळी विज्ञान शोधून काढू शकेल काय ? किंवा कोणाच्यातरी जीन्स किंवा डीएनए वरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती आणि कोणत्या प्रकारच्या चिंता आणि समस्या येणार आहेत हे विज्ञान सांगू शकेल का ? एखाद्या

आणि इतक्या साऱ्या समृद्धीच्या साधनांनी व मार्गांनी देखील मनुष्य सुखी होण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा विज्ञानाने ' मेंदूच्या ' कार्यपद्धतीवर प्रयोग करण्यास सुरुवात केली . चिंतेत असताना मनुष्याच्या मेंदूतून ' कोणते स्त्राव स्त्रवतात , किंवा कोणत्या ग्रंथींमधून कोणत्या प्रकारची रसायनं स्त्रवली जातात हे देखील शोधण्याचा प्रय त्याने केला . काही अंशी विज्ञानाला त्यात यश देखील प्राप्त झालं . या प्रयोगांवरून ता 13 असं निघालं की ' मेंदूतून ' अमुक एका रसायनाच्या स्त्रवणामुळे मनुष्याला अमुक अमु . भावनांचे आघात सहन करावे लागतात . आणि घाईघाईने त्याने असाही निष्कर्ष काढला की मनुष्याच्या सर्व भावनांच्या चढउतारांमागे ' मेंदूच ' कार्यरत आहे . परंतु इथं मी स्पष्ट करतो की , विज्ञानाचा हा निष्कर्ष मुळीच बरोब्बर नाहीए . कारण भावभावना मी पाठवतो आणि मेंदू केवळ त्यावर त्याची प्रतिक्रिया देतो . आता , या प्रतिक्रियांचं विज्ञानाला कितीही विश्लेषण करू देत , पण त्याच्या हाती फारसं काहीही लागणार नाही . कारण काहीही झालं तरी ' मेंदूतून ' अमुक एका प्रकारच्या रसायनाचं स्त्रवण बंद करणारं इंजेक्शन किंवा मग असं एखादं औषध जे घेतल्याने मनुष्याची चिंतेतून कायमची सुटका होईल अशा औषधाचा शोध लावता येणं विज्ञानाला शक्यच होणार नाही . असो , इतकं करूनही हाती काहीच न पडल्याने त्या पुढे जाऊन विज्ञानाने डीएनए व जीन्सचा शोध लावला . निश्चितच , विज्ञानाच्या या शोधाबद्दल त्याला शतशः प्रणाम ! विज्ञानाचं हे एक असं यश आहे की ज्यामुळे मनुष्याबद्दलच्या अनेक रहस्यांवरचा पडदा उठवला गेला . परंतु तरीही मनुष्याच्या दुःखाच्या व चिंतेच्या बाबतीत मात्र गोष्टी जिथल्या तिथंच राहिल्या . कारण , डीएनए तसंच जीन्स , मनुष्याची शारीरिक रचना , त्याचं वय , त्याच्या त्वचेचा रंग इत्यादी घटकांबद्दल भले संपूर्णतः माहिती देण्यास उपयुक्त ठरले असतील परंतु मनुष्याची चिंता , व्यथा , क्रोध इत्यादी भावनांवर कोणत्याही प्रकारचं प्रभावी विश्लेषण करण्यास असमर्थ ठरले आहेत . मात्र , डीएनए व जीन्सचं डीकोडिंग व पुनर्रचनेवर देखील काम चालू केल्याच्या संदर्भात विज्ञानाला पुन्हा एकदा सलाम करायला हवा . निश्चितस्वरूपी , विज्ञानाने पादाक्रांत केलेली ही अशी शिखरं आहेत ज्यांची जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे . परंतु प्रश्न हाच आहे की , या सर्वांतून काय साध्य होतंय ? मनुष्याचे काही आजार कायमचे बरे झाले , त्याचं आयुर्मान वाढलं , परंतु , भावभावनांचे चढ - उतार तर त्याला आजही सहन करावे लागतच आहेत त्याचं काय ? . . . म्हणजेच , एकूण काय तर विज्ञानाच्या या सर्व प्रयत्नांचा संबंध केवळ मनुष्याचं वय आणि शारीरिक स्वास्थ्यापुरताच जोडला जाऊ शकतो . मनात उठणाऱ्या भावभावनांच्या वादळांपर्यंत हे प्रयत्न पोहोचूच शकत नाहीत ! तुम्ही म्हणाल , हे सगळं आपलं तूच तुझ्या स्वतःबद्दल म्हणतो आहेस . . . पण , आम्ही यावर विश्वास कसा काय ठेवायचा ? मला माहीत आहे की या वैज्ञानिक युगांत मी

ऑपरेशनद्वारे मनुष्याच्या आतमध्ये लपून बसलेलं दुःख कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणं विज्ञानाला कधी शक्य होईल का ? . . . प्रश्नच येत नाही ! कारण या सर्वच काळ - अंतराळाच्या कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत आणि विज्ञानाची पोच तिथवर नक्कीच नाही ! _ _ _ म्हणूनच , शेवटी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून माझं हे अदृष्य अस्तित्व किंवा माझं अदृष्य जग ओळखा . त्यानंतर निश्चितपणे माझ्याबरोबर प्रयोग करून तुम्ही चिंता व दुःखांपासून कायमची सुटका करून घेऊ शकाल . जर तुमच्या अंतर्गत वसलेल्या ' मला ' बरोब्बर ओळखण्यात तुम्ही सफल झालात तर आनंद व यश तुमच्या नशिबी येईल . एकूण काय तर , माझ्याबरोबर प्रयोग करण्याची कला तुम्ही आत्मसात केलीत तर तुमचं एकूण जीवनच एक सुखद यात्रा होईल . * *

सोर्स -अनमोल

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा नियमावली व नोंदणी माहिती..