राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा नियमावली व नोंदणी माहिती..

नोंदणी करिता लिंक ___
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScwXVcjP62iByv6VWTeai5XewfxwCXk28qDFc--UjcR1x-jbA/viewform
________________________
नियमावली खालील प्रमाणे
_________________________

_ज्ञानशक्ती स्वीकारदीन महोत्सव _
दिनांक - २३ व २४ मार्च २०२४ 
आयोजक - ग्लोबल महानुभाव संघ...

_राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नियमावली_

सर्व स्पर्धकांनी खालील नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

१ सपर्धकास मिळणारा वेळ - ७ मिनिटे ५+२
२ स्पर्धेतील कोणत्याही एका विषयावर आपले मत मांडावे लागेल .
३ स्पर्धकास मराठी व हिंदी  भाषेचा वापर करता येईल .
४ स्पर्धकांनी त्यांचे पूर्ण भाषण लक्ष्यात ठेवणे अपेक्षित आहे आणि त्याला कागद नोट्स किंवा कार्ड्स मधून भाषणाचा कोणताही भाग वाचण्याची परवानगी नाही. इंडेक्स कार्डचा वापर करण्याची परवानगी आहे परंतु केवळ बाह्य रेखा आणि की वर्ड्स किंवा पॉईंटच्या संदर्भातील शब्दशः वाचन केल्यास स्पर्धकांच्या स्कोर मध्ये घट होईल 
आपले इंडेक्स कार्ड बोलून झाल्यावर परिक्षकाकडे जमा करावे लागतील .
५ खालील निकषावर आधारित गुण दिले जातील - 

© सामग्री -
• अभिवादन आणि विषयाचा परिचय 
• मुख्य विषयांचे प्रदर्शन ( संदेशाची संक्षिप्तता आणि स्पष्टता मौलिकता ऋषीचे मुद्दे इत्यादी )
• नैतिक आणि व्यवहारिक अनुप्रयोग
• निष्कर्ष 
• विषयाची पूर्ण मांडनी 

© भाषण सादरीकरण -
• स्मरणशक्ती ( विराम आणि इंडेक्स कार्ड्सचां संदर्भ देऊन मूल्यमापन)
• शाब्दिक स्पष्टता ( शब्दांची घोषणा आणि उच्चार आवाजाची ताकद आणि प्रक्षेपण ) 
• सादरीकरण / बोलण्याची शैली ( शिष्टाचार प्रेक्षक संपर्क आणि आवाजातील चढ उतार प्रेक्षकांना त्यांच्या बोलण्याच्या शैलीने गुंतून ठेवण्याची क्षमता ) 
६ तज्ञ परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल तो सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहील 
७ स्पर्धेमध्ये ऐनवेळी बदल करण्याचा अधिकार संयोजन समितीकडे राहील
८  सर्व स्पर्धकांनी आपली उपस्थिती आणि सर्व नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल
९  सहभागी स्पर्धकास कोणत्याही धर्माचा जातीचा समुदायाचा विचाराचा अपमान होईल अशा प्रकारचे वक्तव्य करता येणार नाही आणि असे केल्यास त्या सभा उपस्थित श्रोता वर्ग आयोजन समिती परीक्षक रुंद जबाबदार राहणार नाही, सर्वस्वी जबाबदारी त्या स्पर्धकाची असेल आणि  त्यास बाद करण्यात येईल .

१०- स्पर्धकाची पात्रता-
वयोगट १८ च्या पुढे व ५० च्या आत असावा

__________निबंध स्पर्धेची नियमावली ______

अ) सर्व साधारण निकष-
1)आशय संपन्नता 
२) विचारातील अद्ययावतता, सामाजिक बांधिलकी
३)मांडणी, तर्कशुध्दता
४)भाषा शैली-परिणामकारकता
५)भाषाशुध्दता

च) निबंधाबाबत अपेक्षा-

१) विषय व  समाज निरीक्षण, चिंतनशिलता,
२) संदर्भासाठी दिलेले ग्रंथ, त्यांचे लेखक, ग्रंथाची आवृत्ती, प्रकाशन, पृष्ठ क्रमांक, इ. बिनचुक माहिती
३) मुद्देसुदपणा, विधायकता व सिद्धांतिक दृष्टिकोन असावा.

क) स्पर्धकाची पात्रता-
*वयोगट १८ च्या पुढे व ५० च्या आत असावा .
 *महाराष्ट्राचा रहिवासी असावा .

ड) स्पर्धेचे नियम-
१)  शब्द मर्यादा ५००० शब्द-
२)  माध्यम-मराठी,हिंदी भाषा 
३)  निबंध तीन प्रतीत सादर करणे आवश्यक राहील.
४)  निबंध सुवाच्च व सुस्पष्ट असावा.
५) चित्रे, आकृत्या असल्यास त्या सुस्पष्ट व सुरेखित असाव्यात.
६) स्पर्धकाने आपले नांव निंबधपत्राच्या कोणत्याही पृष्ठावर लिहू नये. केवळ पहिल्या पानावर लिहावे .
७)  नियुक्त केलेल्या परीक्षक समितीने दिलेला निर्णय स्पर्धकाना बंधनकारक राहील.
८) निबंध स्पर्धे व्यतिरिक्त इतरत्र कुठल्याही माध्यमातून अथवा कुठल्याही प्रकारे प्रदर्शित केलेला नसावा . असे घडल्यास स्पर्धेतून त्या निबंधास बाद करण्यात येईल .
९) पारितोषिक मिळालेले निबंध संस्थेच्या महानुभाव दर्शन डिजिटल मासिकात यथावकाश प्रसिध्द करण्याबाबतचे अधिकार मंडळास राहतील. या व्यतिरिक्त कुठेही लेखकास तो निबंध प्रकाशित करता येणार नाहीत .

१०) स्पर्धकांनी निबंध दिलेल्या वेळेत स्वतः च्या हस्ताक्षरात लिहिलेली पाने व्यवस्थित स्केन करावी व पी डी एफ तयार करून _ mahanubhavpublication@gmail.com या मेल आयडी वर पाठवावीत  .

संस्थेने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोर पने करणे बंधनकारक आहे .

दोन्ही स्पर्धा संदर्भातील अधिक माहिती साठी 
मुनिश्री सुदर्शन दादा - 9423160110 /
श्रीमोहनराज - 9405192325 /
त.योगिता ताई - 
9766756944 /
किरण पाटील
9404842570
   यांना संपर्क करावा....

-------------------------

टिप्पणियाँ