माझं अस्तित्व
जर मला माझ्याबद्दल म्हणजेच , तुमच्या मनाबद्दल काही सांगायचं झालं , तर असं म्हणता येईल की समस्त मनुष्यप्राण्यांमध्ये मी समान रूपांत उपस्थित आहे . आणि तुमच्यातील समजून घेण्याची क्षमता तुम्ही थोडीशी वाढवलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की मनुष्याच्या संपूर्ण आयुष्याची सूत्रं ही सर्वार्थाने माझ्याच हाती आहेत . आणि इथं , माझ्या प्रभावाबद्दल बोलायचंच झालं तर माझा स्पर्श झाला नाही असा , मनुष्य जीवनाचा एकही पैलू नसेल . आणि माझ्या कार्यपद्धतीबद्दल बोलायचं झालं तर ती इतकी क्लिष्ट आहे की माझ्याबद्दल तुम्हाला काहीही समजावून सांगणं तितकसं सोपं नाही आहे . याचं कारण असं की ' मीच ' तुमचं सर्वस्व असून देखील माझ्याविषयी तुम्ही सर्वथा अनभिज्ञ आहात . मला समजून घेण्याच्या आणि आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांत कितीतरी बुद्धिवंत अक्षरशः तोंडघशी पडले आहेत . म्हणूनच सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या अस्तित्वाबद्दल सांगू इच्छितो . कारण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतकी प्रगती करून देखील , विज्ञान माझ्या अस्तित्वाबद्दल अजूनही संभ्रमातच आहे ! अर्थात , याचंही एक पायाभूत कारण आहे . खरं पाहता , विज्ञान हे ...